बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत रा.ए.स्मा. रुग्णालय, बा. य. ल. नायर रुग्णालय, लो.दि.म.स. रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालय, सर्व विशेष रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतिगृहे व उपनगरीय रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील एम-21 (रु.35400-112400+ अनुज्ञेय भत्ते) या वेतनश्रेणीतील गट-क मधील “परिचारीका (Staff Nurse)” या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणा-या व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडून दि. 08/03/2023 ते दि. 21/03/2023 या कालावधीत जाहीरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने या विभागास प्राप्त झालेल्या तसेच कागदपत्रांच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता खालीलप्रमाणे प्रसारीत करण्यात येत आहे.
जाहिरातीतील आरक्षणनिहाय एकूण रिक्त पदांच्या 10% अतिरिक्त (जास्तीच्या) उमेदवारांचा समावेश तात्पुरत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. सदर तात्पुरती यादी ही मूळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे फेर पडताळणी व निवडीच्या निकषांची पूर्तता यांच्या अधिन राहून तयार करण्यात आलेली आहे. तसेच समांतर आरक्षणांतर्गत उमेदवारांची यादी ही विहित शासन निर्णय, शासन परिपत्रके तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसारीत केलेली परिपत्रके व जाहिरातीत नमूद रिक्त पदे, निवडीचे निकष, अटी व शर्ती नुसार तयार करण्यात आलेली आहे.
तात्पुरती यादी ही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असल्याने सदर यादी ही अंतिम गुणवत्ता यादी नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यास्तव या तात्पुरत्या यादीच्या आधारे भविष्यात उमेदवाराचा “परिचारीका (Staff Nurse)* पदावर नियुक्तीसंबंधी कोणाताही हक्क/दावा राहणार नाही. सदर यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून उमेदवारास नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. सदर तात्पुरत्या यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद करण्यात आली आहेत. त्यांनी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगासाठी), वॉर्ड नं. 07 (प्रशिक्षण / लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर,
साने गुरुजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई- 400 011. येथे सर्व मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीकरीता उपस्थित राहावे.
DOWNLOAD NOW
When will be the final list declared.