बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते “परिचारीका (Staff Nurse)” पदाची अंतिम निवडयादी व त्याअनुषंगाने उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना.

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत रा.ए. स्मा. रुग्णालय, वा. य. ल. नायर रुग्णालय, लो. टि. म.स. रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालय, सर्व विशेष रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतिगृहे य उपनगरीय रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील एम-21 (रु.35400-112400 + अनुज्ञेय भत्ते) या वेतनश्रेणीतील गट-क मधील “परिचारीका (Staff Nurse) या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणा-या व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडून दि. 08/03/2023 ते दि.21/03/2023 या कालावधीत जाहीरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.

त्याअनुषंगाने, या विभागास प्राप्त झालेल्या अर्जाच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता दि. 12.07.2023 व दि. 18.07.2023 रोजी MCGM Portal वर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसारीत करण्यात आली होती. सदर यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी कस्तुरबा रुग्णालय येथे दि.24.07.2023 ते दि.08.08.2023 पर्यंत करण्यात आली होती. उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर ‘परिचारीका (Staff Nurse)” पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवडयादी खालीलप्रमाणे प्रसारीत करण्यात येत आहे.

“परिचारीका (Staff Nurse)” पदाकरीता अंतिम निवडयादी ही विहित शासन निर्णय, शासन परिपत्रके तसेच वृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसारीत केलेली परिपत्रके व जाहिरातीत नमृद रिक्त पदे, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, निवडीचे निकष, अटी व शर्ती नुसार तयार करण्यात आलेली आहे.

अंतिम निवडयादीत समावेश असलेला उमेदवार “परिचारीका (Staff Nurse)” पदभरतीच्या नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर निवडीचे निकष, अटी व शर्ती व विहित शासन निर्णयानुसार अपात्र आहे, असे निदर्शनास आल्यास सदर उमेदवाराची “परिचारीका (Staff Nurse)” पदासाठी झालेली निवड रद्द करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या (90% अंतर्गत) ‘खुला प्रवर्गातर्गत एकूण 360 रिक्त पदांसाठी 287 (276 सर्वसाधारण, + 01 खेळाडू, +10 दिव्यांग) उच्च गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांची ‘परिचारीका’ (Staff Nurse)’ पदासाठी अंतिम सामाईक निवडयादी खालील प्रमाणे आहे.

खुला प्रवर्गाअंतर्गत 360 रिक्त पदांपैकी समांतर आरक्षणांतर्गत खेळाडू-18 पदे, प्रकल्पग्रस्त 17 पदे, भूकंपग्रस्त-07 पदे, पदवीधर पदविकाधारक अंशकालिन -36 पदे अशी एकूण 76 पदे उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर पदे खुला प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात आलेली आहेत. तसेच, खुला प्रवर्गाअंतर्गत समांतर आरक्षणांतर्गत माजी सैनिक 54 पदे, अनाथ-06 पदे, दिव्यांग-13 पदे एकूण 73 पदे उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार रिक्त ठेवण्यात आली आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment